Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पोटच्या तीन वर्षीय चिमुकलीचे भिंतीवर डोके आपटून जन्मदात्या वडीलांनीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड मधील चिंचोली येथून समोर आला आहे. मुलगी घरात रडत असल्यामुळे वडीलांना राग आल्याने तिचे डोके भिंतीवर आपटले. त्यातच तिची मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महादेव नारायण गायकवाड (वय २२, रा. चिंचोली) असे मुलीची हत्या केल्याच्या वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार किशोर बबनराव दुतोंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pimpri News) पोलीसांनी आरोपी वडीलास अटक केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे.
मुलगी रडत असल्याचा राग आल्याने केली हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षाची चिमुकली घरात रडत होती. तेव्हा तिच्या वडीलांना ती रडत असल्याचा राग आला त्यातूनच आरोपी वडील महादेव याने चिमुकलीच्या पोटात लाथाबुक्यांनी मारहाण केली. (Pimpri News) त्यानंतर उचलून तिचे डोके भिंतीवर आपटले. यात चिमुकलीचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : भोसरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या
Pimpri News : चिखलीत नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; दोघांना अटक