Pimpri News : पिंपरी-चिंचवड : राजस्थान येथील अफू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पिंपरी-चिंचवड येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने केला आहे. अफूची पोती विकण्याआधीच पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकून तब्बल ६० किलो अफू जप्त केला आहे.
चाकण म्हाळुंगे परिसरातील घटना
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश जीवनराम बिश्नोई, कैलास जोराराम बिश्नोई आणि मुकेश गिधारीराम बिश्नोई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चाकण म्हाळुंगे परिसरात विरळ वस्ती असलेल्या ठिकाणच्या एका गोडाऊनमध्ये राजस्थान येथील टोळी अफू साठवत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. (Pimpri News) येथे टेम्पोतून अफूची पोती आणली जात होती. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आठ दिवस गोडाऊनवर लक्ष ठेवले. या टोळीचा मुख्य सूत्रधार राकेश जीवनराम बिश्नोई याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
गोडाऊनमध्ये जाऊन ६० किलो अफू पोलिसांनी जप्त केला. त्याची किंमत आठ लाख ७४ हजार रुपये असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे संतोष पाटील यांनी दिली. (Pimpri News) अफूची छोटी-छोटी पॅकेट करून ती नशा करणाऱ्या व्यक्तींना विकली जाणार होती. एक किलो अफूची किंमत १५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, आरोपींनी अफूचा साठा राजस्थान येथून आणल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी राजस्थानमधील आरोपीचा शोधदेखील पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली (Pimpri News) अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत महाले पोलिस उपनिरीक्षक राजन महाडिक, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर दळवी, प्रदीप शेलार, अशोक गारगोटे, बाळासाहेब सूर्यवंशी, मयूर वाडकर, संतोष भालेराव, दादा धस, अजित कटे, रणधीर माने, मितेश यादव, पांडुरंग फंदे, बाळू कोकाटे यांच्या पथकाने केली आहे.