Pimpri News : पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. दर दोन दिवसांनी वेगळे प्रकरण पुढे येत आहे. कोयता दाखवून, दहशत माजवून नागरिकांना लूटण्याचे प्रकार सुरुच आहेत. कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरु आहेत. गँगच्या म्होरक्याला अटक केली आहे. तर काही गुन्हेगारांवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. कोयत्याची विक्री करताना आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. कोम्बिंग ऑपरेशननंतर गुन्हेगार मोकाट असल्याचे स्पष्ट होत आहे. रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये एका दुकानात घुसून कोयता गॅंगने व्यापाऱ्यावर हल्ला केला आणि दहशत माजवली.
चिखली परिसरातील घटना
कोयता गँगची दहशत पिंपरी चिंचवडमध्येही वाढली आहे. कोयता गँगने दुकानात घुसून व्यापाऱ्यावर हल्ला केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. (Pimpri News) या वेळी परिसरातील वाहनांची तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात व्यापारी जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. चिखली पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
दरम्यान, कोयता गॅंगची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्त, उपायुक्त रस्त्यावर उतरले आहेत. पुणे परिसरात ‘कोम्बिंग’ ऑपरेशन राबवण्यात आले. पोलिसांनी कोयता गॅंगची दहशत संपवण्याचा चंग बांधला आहे. शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मकोका’नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Pimpri News) कोंबिंग ऑपरेशनमुळे अनेक गुन्हेगारांना अटक झाली. काहींना नोटीस देण्यात आली. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली. पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी शुक्रवारी मध्यरात्री शहरातील अनेक पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. त्यानंतर पोलीस अधिकारीही दक्ष झाले. परंतु कोयता गँगची दहशत कमी होत नाही.
दरम्यान, आयुक्त रितेशकुमार यांनी शुक्रवारी मध्यरात्री शहराच्या मध्यवस्तीतील पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. सहआयुक्त संदीप कर्णिक येरवडा परिसरात लक्ष ठेवून होते.(Pimpri News) त्यानंतर दोघेही शिवाजीनगर पोलीस चौकीत भेटले. त्यानंतर त्यांनी खडकी, स्वारगेट परिसरातही भेटी दिल्याने इतर पोलीस अधिकारी ‘दक्ष’ झाले होते. अशा प्रकारचे ‘कोम्बिंग’ ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई पुणे पोलीस गेली आठवडाभर करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : धक्कादायक! इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या; काय आहे कारण?
Pimpri News : मावळ तालुक्यातील खोली भाडेतत्त्वार देण्यास नकार दिल्याने कोयत्याने तोडफोड