Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News | पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘मेगा ओपनिंग’: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 13 May 2023, 12:57

Pimpri News | पिंपरी : आशिया खंडातील सर्वाधित गतीने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. तसेच, आंद्रा प्रकल्पांतर्गत चिखली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रासह १६ प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे समाविष्ट गावांतील पाणी समस्या सोडवण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची ‘वचनपूर्ती’ यानिमित्ताने होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने सोमवारी, दि. १५ मे रोजी सकाळी ११ वाजता विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन आणि आंद्रा प्रकल्पातील चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण प्रत्यक्ष होणार असून, उर्वरित प्रकल्पांचे ऑनलाईन लोकार्पण व भूमिपूजन होईल. त्यासाठी आकुर्डी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे, या नाट्यगृहात पहिलाच कार्यक्रम उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे.

 

लोकार्पण होणारे प्रकल्प पुढीलप्रमाणे :

महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली येथील १०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आणि इतर कामांचे उद्घाटन, तारांगण प्रकल्प, नवीन प्रशासकीय इमारत भूमिपूजन, ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन, तळवडे येथील इंद्रायणी नदीवरील पंप हाउसचे आणि इतर प्रकाल्प, बोऱ्हाडेवाडी शाळा इमारत, मोशी सब फायर स्टेशन, रावेत येथील उद्यान, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर येथील मध्यवर्ती निर्जुंतूकीकरण पुरवठा विभाग, ब- क्षेत्रीय कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, नेहरुनगर येथील नवीन शाळा इमारत, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, घरकुल, चिखली येथील भाजी मंडई, निगडी येथील लाईट हाउस प्रकल्प, कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल येथील लॉन टेनिस कोर्ट, प्राधिकरण येथील वीर सावरकर उद्यान से. क्र. २६ येथील लॉनटेनिस कोर्टचे लोकार्पण करण्यात येत आहे.

भूमिपूजन होणारे प्रकल्प पुढीलप्रमाणे :

भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेलच्या कामाचे भूमिपूजन, पिंपरी येथील डेअरी फार्म पुल, मोशी-डुडूळगाव येथील प्राथमिक शाळा, गवळीनगर आणि कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र, भोसरी धावडेवस्ती येथील पाण्याची उंच टाकी उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येत आहे. तसेच, महापालिका हद्दीतील सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण करणे व मालमत्तांची सुधारित कर आकारणी करणे, मालमत्ता कर विभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरवणे यासह दिव्यांग नागरिकांकरिता निरायम आरोग्य विमा योजनेचा प्रारंभ करण्यात येत आहे.

समाविष्ट गावांमधील पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन निवडणूक काळात आम्ही दिले होते. या प्रकल्पांतर्गत चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे. तसेच, भामा आसखेड प्रकल्पांतर्गत जॅकवेल प्रकल्पाचा भूमिपूजनही होणार आहे.

समाविष्ट गावांमधील नागरिकांना दिलेला शब्द आज पूर्ण होतोय, याचे समाधान वाटते. तसेच, शहराच्या लौकीकात भर घालणारी राज्यातील सर्व महापालिकांमध्ये सर्वात मोठी प्रशासकीय इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. यासह ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, शाळांच्या इमारती, आरोग्य विषयक प्रकल्प, समाविष्ट गावांमधील अग्निशमन उपकेंद्र असे पथदर्शी प्रकल्प दृष्टीक्षेपात आले आहेत. ही बाब शहराच्या शाश्वत विकासाच्यादृष्टीने महत्वपूर्ण आहे.

– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Pune News | निमगाव म्हाळुंगी परिसरातून पाच किलो गांजा जप्त ; एकाला बेड्या, तर एकजण फरार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.