Pimpri News : पिंपरी : घरातील मुलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे घरासमोरून विसर्जन मिरवणूक नेताना ‘डीजे वाजवू नका, पुढे जावून वाजवा’, असे सांगितल्याचा राग मनात धरून २१ जणांनी एका कुटुंबाला काठ्या, कोयते, लोखंडी सळई व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी २१ जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी (ता. २५) रात्री ११ वाजता सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्तीत ही खळबळजनक घटना घडली.
२१ जणांना अटक
याबाबत सुनील प्रभाकर शिंदे (वय ३८, रा. सोमाटणे फाटा) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २१ जणांना अटक करण्यात आली आहे. (Pimpri News) सुनील बंदा रजपूत (वय २८), मुकेश करसन रजपूत (२६), रवी करसन रजपुत (३०), सनी करसन रजपुत (३२), प्रवीण करसन रजपुत (३०), अक्षय ज्ञानेश्वर काकडे (२८), अतुल वेलसी रजपुत (२१), कृष्णा बलभीम खराते (२३), रवी हिरा रजपुत (२८), संदीप रमेश रजपुत (२९), विशाल काळुराम रजपूत (२९), संतोष काळुराम रजपूत (२५), विलास हिरा रजपूत (२२), अनिल हिम्मत रजपूत (३१), करसन जयंती रजपूत (५०), दिपक हिम्मत रजपूत (३२), आकाश अशोक रजपूत (२१), काळुराम भिका रजपूत (५५), वसंत भिका रजपूत (५१), अमित वेलसी रजपूत (२४) आणि रमेश जयंती रजपूत (५०, सर्व रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा) यांना अटक करण्यात आली आहे. जीवे मारण्याच्या उद्देशाने घरावर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. मुलाच्या निधनाचे दुःख असल्याने गणपती विसर्जन मिरवणूक घरासमोरून जाताना ‘डीजे वाजवू नका, पुढे जावून वाजवा’ असे शिंदे यांनी आरोपींना सांगितले. (Pimpri News) शिंदे कुटूंबाच्या विनंतीला मान देवून आरोपींनी शिंदे यांच्या घरासमोर वाद्य न वाजवता पुढे जाऊन वाद्य वाजवले. परंतु आपल्याला वाद्य बंद करायला लावल्याचा राग त्यांच्या मनात होता.
याच रागातून फिर्यादी शिंदे, त्यांचा भाऊ गणेश शिंदे, आई सुरेखा शिंदे, वडील सदाशिव शिंदे, वाहन चालक जन्मराज कांबळे, मित्र किरण येवले यांना काठ्या, कोयते, लोखंडी सळई, लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : चिंचवडमध्ये एसटी बस दुभाजकाला धडकून अपघात; जिवीतहानी टळली
Pimpri News : प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज फाडला; हिंजवडी ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल