Pimpri News : पिंपरी : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिरगाव परिसरात पवना नदीच्या काठी सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. यामध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे दहा हजार लिटर रसायन, ३० गुळाच्या ढेपा, असा एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
७ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त!
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी राहुल ननावत या महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळमधील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी भट्टी दारू तयार केली जाते, (Pimpri News) अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलीस कर्मचारी सदानंद रुद्राक्ष आणि प्रदीप शेलार यांना इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड मारून गावठी हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त केला आहे.
यामध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे दहा हजार लिटर रसायन, तीस गुळाच्या ढेप असा एकूण सात लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. (Pimpri News) याप्रकरणी अश्विनी राहुल ननावत या महिलेवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : मॉल, बंद दुकानांवर दरोड्याचा कोयता गॅंगचा प्रयत्न फसला; चौघांना अटक, एक फरार
Pimpri News : चोरी, घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Pimpri News : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर