Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : नितीन म्हस्के खूनप्रकरणी १७ आरोपींना दोन दिवसांत अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 18 August 2023, 18:20

Pune News : पुणे : पुण्यातील मंगला थिएटरबाहेर नितीन मोहन म्हस्के (वय ३५, रा. ताडीवाला रोड, पुणे) याचा बुधवारी (ता. १६) पहाटे निर्घृण खून करण्यात आला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची सहा पथके गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तयार केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत १७ आरोपींनी विविध ठिकाणांवरुन ताब्यात घेतले आहे.

६ पथकांनी अथक प्रयत्न करून आरोपींना केले जेरबंद

बुधवारी पहाटे १.१० वाजण्याच्या सुमारास एका ३५ वर्षीय तरुण नितीन म्हस्के चित्रपटगृहाबाहेर चित्रपटाचा लेट नाईट शो पाहून बाहेर पडला असताना त्याची हत्या करण्यात आली. त्याच्यावर तलवारी, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत सतिश वानखेडे याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.(Pune News)  त्यानुसार सागर कोळानट्टी उर्फ यल्ल्या, मलिक उर्फ मल्या कोळी, इम्रान शेख, पंडीत कांबळे, विवेक उर्फ भोला, लॉरेन्स पिल्ले, सुशील सूर्यवंशी, मनोज हावळे, आकाश उर्फ चडी, रोहन उर्फ मच्छी यांच्यासह इतर ७ ते ८ जांवर आयपीसी ३०२, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखेकडली युनिट -१, युनिट -२, खंडणी विरोधी पथक -१, दरोडा व वाहन चोरी पथक -१ अशी सहा पथके तयार करण्यात आली होती. आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत माहिती घेत असताना (Pune News) गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर उर्फ यल्ल्या व त्याचे साथीदार लातूर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, पुणे शहर परिसरात तसेच कर्नाटक राज्यातील रायचूर, बेळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्याद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कर्नाटकात जाऊन आरोपींचा शोध घेऊन ५ जणांना ताब्यात घेतले. सागर उर्फ यल्ल्या ईराप्पा कोळानट्टी (वय-३५ रा. ताडीवाला रोड, सध्या रा. हडपसर), सुशिल अच्युतराव सुर्यवंशी (वय-२७ रा. ताडीवाला रोड, पुणे), शशांक उर्फ वृषभ संतोष बेंगळे (वय-२१ रा. ताडीवाला रोड), गुडगप्पा फकीरप्पा भागराई (वय-२८ रा. बुद्धविहार जवळ, ताडीवाला रोड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला रायचूर, हुबळी येथील दुर्गम भागात शोध घेऊन ताब्यात घेतले.

विश्रांतवाडी, पुणे शहर, चौफुला, पुणे ग्रामीण भागातून पुण्यातील पथकाने ५ आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. मलेश उर्फ मल्ल्या शिवराज कोळी (वय-२४ रा. भाजी मार्केट, ताडीवाला रोड), किशोर संभाजी पात्रे (वय-२० रा, रमाबाई आंबेडकर रोड, पुणे), साहिल उर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय-२० रा. महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड), गणेश शिवाजी चौधरी (वय-२४ रा. कुंजीरवाडी, ता. हवेली), रोहित बालाजी बंडगर (वय-२० रा. ताडीवाला रोड) यांना अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या दोन पथकांनी या गुन्ह्यातील एकूण १० आरोपींना ताब्यात घेतले.

केशवनगर, मुंढवा, पुणे शहर भागात आरोपींचा शोध खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घेतला. (Pune News) पथकाने विवेक उर्फ भोला भोलेनाथ नवघरे (वय-२५, रा. मुळीक कॉम्पलेक्स, रामवाडी), इम्रान हमीद शेख (वय-३१ रा. झेड कॉर्नर, केशवनगर) यांना ताब्यात घेतले. तसेच दरोडा व वाहन चोरी पथक एकचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने खडकवासला, पुणे ग्रामीण भागातून आकाश उर्फ चड्डी सुनिल गायकवाड (वय-२२, रा. उत्तमनगर) याला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या नेतृत्वातील पथकाने खराडी, कल्याणीनगर या भागात आरोपींचा शोध घेऊन चार जणांना ताब्यात घेतले. लॉरेन्स राजू पिल्ले (वय-३६ रा. ताडीवाला रोड), मनोज उर्फ बाबा विकास हावळे (वय-२३, रा. जोगमाया मिनीमार्केट जवळ, ताडीवाला रोड), रोहन उर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय-२३), विकी उर्फ नेप्या काशीनाथ कांबळे (वय-२२, दोघे रा. नवरत्न तरुण मंडळाजवळ, ताडीवाला रोड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दोन लाख रुपये किंमतीची चार दुचाकी, ५० हजार ५०० रुपयांचे ५ मोबाईल असा एकूण २ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये गुन्ह्यातील मुख्य 9 आरोपी व 8 संशयीत आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या १० आरोपींवर पुणे शहरातील बंडगार्डन व कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. सागर उर्फ यल्ल्या कोळानट्टी याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, एमपीडीए, आर्म अॅक्ट अस एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. (Pune News) सुशिल सूर्यवंशी याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी यासारखे 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शशांक उर्फ वृषभ बेंगळे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. किशोर पात्रे याच्यावर गंभीर दुखापत, जबरी चोरी असे दोन गुन्हे दाखल आहेत. साहिल उर्फ सल्ल्या कांबळे याच्यावर गंभीर दुखापतीचे दोन गुन्हे दाखल आहेत. गणेश चौधरी याच्यावर गंभीर दुखापत, बलात्कार असे तीन गुन्हे दाखल आहेत. रोहित बंडगर याच्यावर वाहन चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. मनोज उर्फ बाबा हावळे याच्यावर खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारीचे तीन गुन्हे दाखल आहेत.

रोहन उर्फ मच्छी तुपधर याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत असे पाच गुन्हे दाखल आहेत. विकी उर्फ नेप्या कांबळे याच्यावर दुखापत करणे, शस्त्र बाळगणे असे दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, युनिट -२ वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, खंडणी विरोधी पथक -१ वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, दरोडा व वाहन चोरी पथक -१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : रक्षाबंधनानिमित्त विशेष राखी लिफाफे पोस्ट ऑफिसमध्ये अल्प दरात उपलब्ध…

Pune News : पुणे, मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरील जीवघेणे अपघात टळणार

Pune News : पुण्यातील खड्ड्यांविरोधात मनसेचे आंदोलन; राज ठाकरे यांचा पाठिंबा; म्हणाले, मी काहीच करू शकत नाही…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

MPSC News : आईच्या स्वप्नाला यशाचा मुलामा..! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील स्वप्नील सावंत यांची 'कर सहाय्यकपदी' निवड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.