Pimpri News : पिंपरी-चिंचवड : भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री टेम्पो मध्ये आराम करत असलेल्या चालकास दोन भामट्यांनी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये टोरट्यांनी चालकाच्या गळ्यातील चैन व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला आहे. ही घटना कासारवाडी येथील नाशिक फाट्यावर शनिवारी (दि. 10) मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास घडली. (An unknown thief robbed a tempo driver at Nashik Phata)
दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी प्रसाद तुकाराम म्हस्के (वय 35, रा. दिघीगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रारदाखल केली आहे. (Pimpri News) त्यावरून दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे टेम्पो चालक आहेत. ते भोसरी कडून कासारवाडीकडे टेम्पो घेऊन जात असताना त्यांना झोप येऊ लागल्याने त्यांनी नाशिक फाटा येथे टेम्पो रस्त्याच्या बाजूला पार्क केला व टेम्पोतच झोपी गेले.(Pimpri News) त्यावेळी दोन अज्ञात चोरटे आले व त्यांनी तक्रारदार यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची साखळी आणि 10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरी-चिंचवड : काळेवाडीत तरुणावर चॉपर, कोयत्याने वार करत खुनी हल्ला
Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाचे सत्र सुरुच; टोळक्याकडून तरुणाचा हत्याराने भोसकून खून
Pimpri News : सांगवीत भारतीय सैन्यातील जवानाने केला सासुवर बलात्कार