Pimpri News : पिंपरी-चिंचवड : स्त्री जातीचे अर्भक रस्त्यावर सोडून येणे किंवा कचराकुंडीत सोडून दिल्याच्या घटना आजपर्यंत आपण वाचल्या, ऐकल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरालगत असलेल्या मरकळगावमधील सुदर्शन वस्ती येथे प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं पुरुष जातीचं अर्भक आढळून आलं आहे. भर पावसात हे बाळ प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेल्या स्थितीत टाहो फोडून रडत होतं. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भर पावसात फोडला टाहो!
याबाबत पेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अर्भक दोन ते तीन दिवसांचे असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भर पावसात या बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून रस्त्यावर सोडण्यात आले होते. (Pimpri News ) स्थानिकांना ही घटना कळल्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. सध्या या बाळावर औंध जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, हा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. २२) दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी मरकळ गावचे पोलीस पाटील विठ्ठल टाकळकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri News ) तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. (Pimpri News ) घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, तपासाला सुरुवात केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : सील केलेल्या फ्लॅटमध्ये बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा