Pimpri News : तळेगाव दाभाडे, (पुणे) : पिंपरी चिंचवडमधील शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा येथे फिरायला आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
अनिकेत वर्मा (वय १७) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अशोक गुलाब चव्हाण (वय – १७, रा. चिंचवड) असे पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. (Pimpri News) अनिकेत वर्मा याचा मृतदेह शोधण्यात पोलीस प्रशासन, वन्यजीव रक्षक मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
कॉलेजला दांडी मारून कुंडमळा येथे गेले होते
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी चिंचवड येथील श्रीमती गेंदेबाई ताराचंद चोपडा ज्युनियर कॉलेज मधील ८ ते ९ मित्र वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी कुंडमळा येथे आले होते. हे सर्व जण कॉलेजला दांडी मारून लोकलने बेगडेवाडी येथे उतरले.(Pimpri News) त्यानंतर त्यांनी सर्वांनी पायी कुंडमळा गाठला. त्यातील चौघे पाण्यात उतरले.
दरम्यान, दोघे जण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वाहून गेले. सकाळी साडेदहा पासून ते रात्री सात वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरु होती. (Pimpri News) अथक प्रयत्नानंतर अनिकेत वर्मा या युवकाचा मृतदेह शोधण्यात पथकास यश आले. अंधार पडल्याने रात्री शोध मोहीम थांबविण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : अबब! साडेपाचशे किलोच्या पुष्पहाराने पिंपरीत अजित पवार यांचे भव्य स्वागत…
Pimpri News : अफू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल ६० किलो अफू जप्त