Pimpri News : पिंपरी : पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतीच एक धक्कादायक घटना बाणेर परिसरात उघडकीस आली आहे. कुरिअरच्या नावाखाली एका महिलेला तब्बल ३६ लाख ९९ हजार ९९९ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मोबाइल क्रमांक आणि स्काइप आयडी वापरकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pimpri News ) संबंधित आरोपीने त्याच्या मोबाइल व स्काइप आयडीवरून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला आणि तुमच्या नावाने कुरिअर आले असून, कस्टम विभागाने ते पकडले असल्याचे सांगितले. यामध्ये लॅपटॉप, गांजा व १४० ग्रॅम एमडीएमए आहे, असेही महिलेला सांगण्यात आले.
दरम्यान, कुरिअर कस्टम विभागाने पकडल्याच्या अनपेक्षित घटनेने महिला घाबरली. या वर महिलेला धीर देत, मी तुम्हाला यातून बाहेर काढतो. (Pimpri News ) मात्र, व्हेरिफिकेशनसाठी ३६ लाख ९९ हजार ९९९ रुपये भरा, असे सांगण्यात आले. व्हेरिफिकेशन झाल्यावर ते पैसे तुम्हाला परत मिळतील, अशी खोटी माहिती सांगून फिर्यादीकडून ऑनलाइन पैसे घेऊन ते परत न देता फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंके करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये ५१ जणांना डेंग्यूची लागण; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली!
Pimpri News : पिंपळे सौदागर परिसरात १५ गाड्या फोडणाऱ्या गुंडांची सांगवी पोलिसांनी काढली धिंड..
Pimpri News : संतापजनक! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ब्लेडने वार; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना…!