Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील गुरुवार रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. याबाबत महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्र, निगडीतील जलशुध्दीकरण केंद्र आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेमधील दुरुस्ती गुरुवारी करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान शुक्रवारी कमी दाबाने व सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहील.
विद्युत दुरुस्तीच्या कामामुळे पाणी बंद
गुरुवारी रावेत येथील अशुध्द जलउपसा केंद्रात विद्युत विषयक दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. सेक्टर 23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत व पाणी पुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. (Pimpri News) तसेच, शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 15) पिंपरी-चिंचवडला सकाळी होणारा पाणी पुरवठा नियमीत वेळेत होईल. मात्र, सायंकाळी होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच शुक्रवारी (दि. 16) सकाळी होणारा पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : व्यावसायिकाकडे हप्ता मागत केली दुकानाची तोडफोड; तिघांना ठोकल्या बेड्या..
Pimpri News : नाशिक फाट्यावर अज्ञात चोरट्याने टेम्पो चालकाला लुटले