Pimpari Crime | पिंपरी-चिंचवड : महावितरणच्या कंत्राटदाराची अडवून करत कंपनीकडे तब्बल 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही माझी जमीन आहे. माझ्या जागेत पाय ठेवाल तर पाय तोडीन अशी धमकीही देण्यात आली.
हा प्रकार ऑगस्ट 2022 ते 1 एप्रिल 2023 या कालावधीत मावळ तालुक्यातील बेबड ओहळ येथे घडला घडला आहे. कंपनीला विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचे काम सुरु असताना ही खंडणी मागण्यात आली.
याप्रकरणी विद्याशंकर शंभूनाथ द्विवेदी (वय 65, रा. बेबडओहळ, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून किरण रंभाजी घारे, परशुराम रंभाजी घारे, रंभाजी आबाजी घारे (सर्व रा. बेबडओहळ, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेबड ओहळ येथे गंगा पेपर्स इंडिया लि या कंपनीने महावितरणकडून विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचे काम केले जात आहे. तक्रारदार या कंपनीत अधिकारी पदावर आहेत. हे काम करत असताना आरोपींनी कंत्राटदाराला अडवून काम करण्यास मज्जाव केला.
तसेच काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. ही माझी जमीन आहे. माझ्या जागेत पाय ठेवाल तर पाय तोडीन, अशी आरोपींनी धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Crime News | यवत : रिक्षाचालकाने प्रवाशाला लुबाडले; ४५ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन फरार