पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पद्म, छत्रपती, अर्जुन अथवा क्रीडा पुरस्कारर्थींना महापालिकेकडून मोठ्या मदतीची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी केले. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने “माझे शहर माझा अभिमान” या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार (दि.10) रोजी हाँटेल कलासागर कासारवाडी, पिंपरी येथे करण्यात आले. यावेळी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
पद्मश्री पेटकर म्हणाले की, क्रीडा पुरस्कारर्थींना पेंशन योजना सुरू व्हावी. तसेच पिंपरी चिंचवड शहराला आयुक्त शेखरसिंह आल्यापासून शहराचा चांगल्या प्रकारे विकास झाला. कोरोना काळापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा मिळकत कर वाढवलेला नाही. आजही दिल्लीत बोर्डावर माझ्या नावाखाली पिंपरी चिंचवड लिहिलेले आहे.
यावेळी बोलताना उमा खापरे म्हणाल्या की, राज्याच्या अनेक भागात मी फीरले. परंतु पिंपरी चिंचवड सारखा विकास कोठेही दिसला नाही. शहरातील रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो, वैद्यकीय तसेच शैक्षणिक सुविधा अभिमान वाटावा अशाच आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखरसिंह यांनी शहरासाठी केलेली कामे प्रचंड कौतुकास्पद आहेत, असे मत उमा खापरे यांनी व्यक्त केले.
परीषदेचे स्वागताध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, या शहराला हरणामसिंग यांच्या नंतर दुरदृष्टी असलेले शेखरसिंह लाभले आहेत, त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक झालेच पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार संघाचा “माझे शहर माझा अभिमान” या उपक्रमासारखा स्तुत्य उपक्रम मी आजपर्यंत पाहिला नाही.
उद्योजक संतोष बारणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराचा हा विकास पाहता या शहराला अजूनही खूप मोठे भवितव्य आहे. यावेळी अभय भोर, अजिज शेख, र्कीडा शिक्षक पी.डी. पाटील, नारायण भागवत, गोविंद वाकडे, नाना कांबळे आदींची भाषणे झालीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब ढसाळ होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार उमा खापरे, उद्योजक संतोष बारणे, कामगार नेते यशवंत भोसले, बाळासाहेब ढसाळ, गोविंद वाकडे, नाना कांबळे, प्रविण शिर्के, प्रशांत साळुंखे, अर्चना मेंगडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात शहरातील वकील, डॉक्टर, अभियंते, आक्रीटेक्ट, व उद्योजक उपस्थित होते.