खेड(पुणे): सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळे सौदागर भागामध्ये पोलिसांकडून 10 किलो 138 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्याकरीता व अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. हरिश मगन सोनवणे (वय 27 वर्षे, रा काळभैरवनगर, यशस्वी हौसिंग सोसायटी, फ्लॅट क्र 12, पिंपरी गाव, पिंपरी पुणे मुळ रा. मौजे शिरपुर, वरवाडे, संत सावतामाळी चौक, ता शिरपुर जि धुळे) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 20 मार्च ला सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, प्रसाद कलाटे, गणेश कर्षे व विजय दौड़कर हे सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळे सौदागर भागामध्ये पेट्रोलींग करीत होते. प्रथम रेस्ट्रो बारच्या समोर, तेथील पाण्याच्या टाकीच्या कंपाऊंडच्या शेजारी असलेल्या रस्त्याच्या कडेला पोलीस अंमलदार विजय दौंडकर व प्रसाद कलाटे यांना एक इसम टि.व्ही.एस. ज्युपीटर या दुचाकी गाडीवर पाठीवर सॅकबॅग व गाडीच्या पुढील बाजुस ट्रॅव्हलींग बैग घेवुन थांबलेला दिसला. त्याला तेथे थांबण्याचे कारण विचारले असता हरिश उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्याचे वागणे संशयास्पद असल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्याची झडती घेतली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या सॅकबॅग व ट्रॅव्हलींग बॅगमध्ये 10 किलो 138 ग्रम गांजा मिळुन आला. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी 10 किलो 138 ग्रॅम गांजा 2 मोबाईल व टि.व्ही.एस. ज्युपिटर असा माल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
त्यानंतर हरिश मगन सोनवणे यास ताब्यात घेऊन एकुण 5 लाख 88 हजार 900 रुपये किंमतीचा 10 किलो 138 ग्रॅम गांजा, त्याच्याकडे मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द सांगवी पोलीस स्टेशन येथे 91/2025 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 20 (ब) (ii) (ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उप आयुक्त गुन्हे , संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 2, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालणे व अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 1 , बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 2 यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयुर वाडकर, प्रसाद कलाटे, गणेश कर्षे व विजय दौडकर यांच्या पथकाने केली आहे.