New Invention AI Based Smart Signal : पुणे : वाहतूक कोंडीमुळे नागरिक चांगलेच त्रासले आहेत. प्रत्येक मोठ्या शहराची गंभीर समस्या आहे. मात्र या समस्येवर पिंपरी चिंचवडमधील एका संगणक अभियंता तरुणांने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पहिल्यांदाच स्मार्ट सिग्नल तयार केला आहे. ( A Young Man From Pimpri Chinchwad Invented AI Based Smart Signal; Useful To Resolve Traffic Issue)
देशात पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सिग्नल यंत्रणेसाठी वापर
आयटी हब अशी ओळख असलेल्या हिंजवडी भागात हा स्मार्ट सिग्नल सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी रियल टाईम ट्राफिक सीसीटीव्ही सेंसर वापरण्यात आलेले आहेत.
देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रियल टाईम ट्रॅफिक सीसीटीव्ही सेंसर सिग्नल उभारण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसर शहरातील सर्वात जास्त वाहतूक कोंडीचा परिसर म्हणूनही प्रसिद्ध आहे. (New Invention AI Based Smart Signal) वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी याठिकाणी अनेक प्रयत्न झाले, मात्र वाहतूक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.
या पार्श्वभूमीवर हिंजवडीतील गर्दीचा समजला जाणाऱ्या विनोदे वस्ती चौकात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पहिला स्मार्ट सिग्नल बसवण्यात आला आहे. या सिग्नलला सीसीटीव्ही कॅमेरासह सेन्सर असल्याने वाहनांच्या गर्दीवर सिग्नलचा वेळ निर्धारित होते, यामुळे चौकातील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र आहे. (New Invention AI Based Smart Signal) शहरातील प्रदीप गिलबिले या संगणक अभिनेत्याने केलेला हा प्रयोग यशस्वी होत असून यानंतर पूर्ण शहरात स्मार्ट सिग्नल दिसण्याची शक्यता आहे.
या सिग्नलला सीसीटीव्ही केमेरा सेन्सर असून वाहनांच्या गर्दीवर सिग्नलची वेळ बदलते. गाड्यांची संख्या कॅप्चर करून सिग्नल बदलला जातो. सिग्नलवर एकही गाडी नसल्यास सिग्नल पडत नाही. (New Invention AI Based Smart Signal) विशेष म्हणजे रुग्णवाहिका, सायरन अथवा दिव्याची गाडी आल्यास सिग्नल हिरवा होतो आणि ते वाहन गेल्यास पुन्हा पूर्ववत होतो.
चौकात चहुबाजूने गर्दी झाल्यास गाड्यांचा सरासरी वेळ लक्षात घेऊन सिग्नल बदलतो. (New Invention AI Based Smart Signal) ग्रीन कॉरिडॉर किंवा व्हीआयपी मुव्हमेंटला सिग्नल आपोआप सेट होतो. तसेच गरज पडल्यास सिग्नल मॅन्युअली हाताळता येतो.
सध्या हिंजवडी परिसरातील फक्त काही सिग्नल वर प्रायोगिक तत्त्वावर हे स्मार्ट सिग्नल बसविण्यात आले आहेत. (New Invention AI Based Smart Signal) या सिग्नलची कार्यक्षमता पाहून लवकरच संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात अशाप्रकारे सिग्नल बसवले जाण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापालिकेचे अनुदान!
pimpri crime : पती व सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात घेतला गळफास