Mann Ki Baat पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद करण्याकरिता सुरू केलेला बहुचर्चित ‘मन की बात’ का कार्यक्रमाच्या १०० व्या भागाचे प्रसारण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रदेश पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व मंडल पदाधिकारी, मन कि बात कार्यक्रमाचे संयोजक, सहसंयोजक, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते यांची ‘झूम’ बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या तयारीबाबत जबाबदारी आणि सूचना करण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, मन की बात कार्यक्रमाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक अमित गोरखे, पिंपरीचिंचवड शहर संयोजक नंदकुमार दाभाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी कार्यक्रम प्रसारीत…!
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये उद्या रविवार, दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारीत होतो. एप्रिल महिन्याचा हा कार्यक्रम १०० वा आहे. त्यामुळे या कार्यक्रमास विशेष महत्व आहे. त्यामुळे शहरातील सर्व शक्तीकेंद्रांवर लाईव्ह प्रसारणाची सुविधा केली आहे. नागरिकांना बसण्यासाठी आणि कार्यक्रम पाहण्यासाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती संयोजक नंदकुमार दाभाडे यांनी दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम ‘‘मन की बात’’ चा शंभरावा कार्यक्रम होत आहे. पंतप्रधानांच्या ऐतिहासिक कार्यक्रमात तमाम पिंपरी-चिंचवडकरांनी सहभागी व्हावे. ‘‘मन की बात ’’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी www.Mygov.in या संकेतस्थळाला भेट द्या. किंवा 1800117800 नंबर डायल करावा, असे आवाहन करीत आहोत.
– महेश किसनराव लांडगे,
शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.