Mahesh Landge पिंपरी : डुडूळगाव आणि चऱ्होली परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना गती देण्यात आली असून, मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसह, डांबरीकरणाच्या कामांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे या भागातील रस्ते चकाचक होणार आहेत.
डुडूळगाव येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन…!
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत डुडूळगाव येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, भाजपा कोशाध्यक्ष सचिन तापकीर, माजी नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांच्यासह विकास बुर्डे, रमेश वहिले, योगेश तळेकर, सचिन तळेकर, बजरंग वहिले, स्वप्ना वहिले, वंदना आल्हाट यांच्यासह सोसायटींचे चेअरमन आणि पदाधिकारी उपस्थित होते.
डुडूळगाव येथील ९ मीटर रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली असून, मंगलम सोसायटी, सूमन सोसायटी आणि सभोवतालच्या परिसराला त्याचा फायदा होणार आहे. या भागात राहणाऱ्या सुमारे ४५० सदनिकाधारकांना ये-जा करणेसाठी प्रशस्त रस्ता उपल्ध करावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून हा रस्ता विकसित होत आहे. यासह अन्य प्रलंबित रस्त्यांची कामांनाही गती देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि सोसायटीधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यापासून सुमारे २० वर्षे डुडूळगाव, चऱ्होली आदी गावांना पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात समाविष्ट गावांतील अंतर्गत रस्त्यांचे जाळे निर्माण करणे हा मुद्दा आम्ही अजेंड्यावर घेतला होता. भाजपा सत्ताकाळात अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. आता शिंदे-फडणवीस सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून मोशी-चिखली-चऱ्होली-डुडूळगाव असा ‘रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित होत आहे, याचे समाधान वाटते.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.