पिंपरी : किवळे येथील इंद्रप्रस्त हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेल्या चार दुकानांना आग लागून दुकाने आगीत राख झाली आहते. ही घटना मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री ११. ४५ वाजताच्या सुमारास घडली असून सुदैवाने या आगीत कोणीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील इंद्रप्रस्त हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेल्या दुकानांना आग लागल्याची माहिती रितेश खांडेलवाल यांनी मंगळवारी रात्री ११. ४५ वाजताच्या सुमारास दिली. त्यानुसार पिंपरी चिंचवड अग्निशामक मुख्यालयातून तीन, प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्रातून एक, पीएमआरडीए अग्निशामक केंद्राचा एक आणि देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळी हजर झाले.
ज्या दुकाना आग लागली होती, त्यांचे शटर हे कुलूपबंद होते. त्यामुळे वेळेवर पावर कटर मशीनने शटर कट करण्यात आले आणि आगीवर होज व होज रील होजच्या साह्याने पाणी मारून युद्ध पातळीवर आग विझविण्यात यश आले. मात्र या आगीत दुकानातील सामानाचे खूप नुकसान झाले आहे.
किती रुपयांचे नुकसान?
या आगीमध्ये पीजीडी कम्प्युटर्स, ओम गणेश इंटरप्रायझेस, श्री दुर्गा प्रोव्हिजन आणि श्री लक्ष्मी केरला स्टोअर आणि हॉटेल ही दुकाने भस्मसात झाली. या आगीत 70 लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज चारही दुकानमालकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
‘या’ जवानांकडून आगीवर नियंत्रण..
अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले, संजय महाडिक, संपत गौंड, सारंग मंगरूळकर, रुपेश जाधव, लक्ष्मण बंडगर, अनिल माने, श्रीहरी धुमाळ, साबळे, ट्रेनि फायरमन शिवाजी पवार, गौरव सुरवसे, सिद्धेश दरवेश, किरण राठोड, राज शेडगे, प्रतीक आहीरेकर, राहुल कराडे, अनिल गोसावी, परमेश्वर दराडे, श्रीवर्धन, पाटील, शिंदे, पवार, मोरे, कूवडे, चिंता, निकम, लावड, चव्हाण, पाटील, तडवी यांनी आगी नियंत्रणात आणली.