Extortion News | पिंपरी : पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त (Acp) पद्माकर घनवट आणि पोलीस राईटर विजय शिर्के यांनी साडेबारा लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिक राजेंद्र चोरगे (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार चोरगे यांची सातारा शहरातील शाहूनगरमध्ये गुरुकुल एज्युकेशन सोसायटी संस्था आहे. ते मागील १४ वर्षापासून या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर सध्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असणारे पद्माकर घनवट यापूर्वी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक होते.
चोरगे यांच्या संस्थेच्या विरोधात कोणतीही तक्रार नसताना स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि राईटर शिर्के यांनी संस्थेत बेकायदेशीर घुसखोरी करुन गुन्हेगारांना मदत केली. याशिवाय पोलीस ठाण्यातील चौकशी दरम्यान त्रास देऊन ब्लॅकमेल केले.
२५ लाख रुपये खंडणी मागून १२ लाख ३० हजार रुपये घेतले…
दरम्यान, पोलीस ठाण्यातील चौकशी दरम्यान त्रास देऊन ‘ब्लॅकमेल’ करत होते. पत्नी व संस्थेतील महिला प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना सूर्यास्तानंतर ताब्यात ठेवत होते. तसलेच घनवट आणि शिर्के यांनी २५ लाख रुपये खंडणी मागून १२ लाख ३० हजार रुपये घेतल्याचाही आरोप चोरगे यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या दोघांची चारवेळा प्राथमिक व विभागीय चौकशी केली. या चौकशी अहवालामध्ये दोघांनी कसुरी केल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले.त्यामुळे न्यायालयाने पोलीस अधिकारी पद्माकर घनवट आणि पोलीस हवालदार विजय शिर्के यांच्याविरोधात तक्रार केली होती.
त्यानंतर कोर्टाने दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असेही चोरगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Dehu News| देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे ; उमेश मोरेंचा केला नऊ मतांनी पराभव
Pune Crime | ऊरुळी देवाची येथील बंद फ्लॅट फोडला; तब्बल सव्वा लाखांच्या ऐवजावर डल्ला