पुणे : मावळ तालुक्यातील कामशेतजवळील वाडीवळे येथील इंद्रायणी नदीवरील पूल यावर्षी पुन्हा पाण्यात बुडाला. त्यामुळे आठ गावांचा संपर्क तुटला आहे.हा पूल या गावांसाठी वाहतुकीचे एकमेव साधन आहे. दरवर्षी हा पूल पाण्यात बुडतो मात्र प्रशासन व राजकारणी याकडे लक्ष देत नाहीत.पूल जुना आहे, नवीन व उंच पूल बांधण्याची गरज आहे. असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान एकमेव पूल आल्याने पूल पाण्यात बुडाला असतानाही दुग्ध व्यावसायिक, मजूर, कामगार आणि शाळकरी मुले यांना नाईलाजाने पूल ओलंडावा लागत आहे.मावळात अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
पवना नदी जवळील तुंग गावाजवळ असणारा पूलही पाण्याखाली जाण्याची भीती आहे.
कामशेत भागात दरवर्षी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. या पावसापासून वाचवण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.यंदा पुणे जिल्ह्यात ४ दिवसांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेकांचे हाल होत आहेत.
कामशेत भागात शेती मोठ्या प्रमाणावर आहे. पुणे जिल्ह्यात २८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. शेतातही पाणी शिरले आहे.