BJP News पिंपरी : आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. यावर्षीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमध्ये मावळ लोकसभा मतदार संघांतर्गत ‘एकत्रित योगा कार्यक्रम’ घेण्यात येणार आहे. (BJP News) यामध्ये पिंपरी-चिंचवडकर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.( Pimpri News)
पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी- प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर दि. २१ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता ‘एकत्रित योगा कार्यक्रम’ होणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, माजी राज्यमंत्री सचीन पटवर्धन, प्रदेश निमंत्रित सदस्य शंकर जगताप, माजी जिल्हा अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी-चिंचवड प्रभारी वर्षा डहाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.(Pimpri News)
योग दिवस मावळ लोकसभा संयोजक राजू दुर्गे म्हणाले की, जगभरातील नागरिकांना योगाचे महत्त्व पटावे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आणि तो जागतिक योगा दिन म्हणून जगभरात साजरा होऊ लागला. आपल्या देशातील सर्व नागरिकांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.Pimpri News योगा हा अनेक शतकांपासून चालत आलेला पारंपरिक व्यायाम प्रकार आहे. योगामधील काही सहज प्रकार जे आपण अत्यंत सहजपणे करू शकता असे प्रकार आणि त्यापासून आपल्याला मिळणारे फायदे या कार्यक्रमातून आपल्याला समजणार आहेत. योग प्रकारांमुळे आपण आपले आयुष्य निरोगी आणि अत्यंत सहजपणे जगू शकतो.(Pimpri News)
दरम्यान, या कार्यक्रमाचे संयोजन राजू दुर्गे, शितल शिंदे, संदीप कस्पटे, रविंद्र माने, बाळासाहेब शेलार, मच्छिंद्र परंडवाल, रामविलास खंडेलवाल, अनंता कुडे, अविनाश बवरे यांनी केले आहे.(Pimpri News)
भोसरीमध्ये इंद्रायणीनगर येथे कार्यक्रम…
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर लोकसभा मतदार संघांतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघातील इंद्रायणीनगर येथे सेक्टर ७ मधील सी- सर्कल येथे दि. २१ जून २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. पतंजली शिक्षक सुनील हुले यांच्या सहकार्याने योगाचे प्रशिक्षण होणार आहे. संयोजनामध्ये माजी नगरसेविका नम्रता लोंढे, कामगार आघाडीचे हनुमंत लांडगे, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष निखिल काळकुटे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.(BJP News) सर्व नागरिकांनी येताना योगा मॅट घेऊन येणे आणि वेळेत उपस्थित राहावे, असे योग दिवस संयोजक गीता महेंद्रु यांनी केले आहे.(Pimpri News)
तरुणीच्या पालकांनी तिच्या मित्र परिवारात चौकशी केल्यावर ती राहुल दत्तात्रय हंडोरे याच्याबरोबर सिंहगड आणि राजगड किल्ला पाहण्यासाठी जाणार होती, असे समजले. तसेच या सर्व प्रकारानंतर राहुल हंडोरे हादेखील बेपत्ता आहे. तरुणीच्या मृतदेहाजवळ तरुणाचे जर्किन सापडले आहे. मात्र, तिचा मित्र अद्याप घरी आला नसून, नातेवाइक त्याचा शोध घेत आहेत. तरुणीचा मित्र सापडल्यानंतर दर्शनाच्या मृत्यूचे गूढ उलघडण्याची शक्यता आहे. यामुळे हा घातपात आहे, की अजून काही? याचा वेल्हे पोलिस तपास करीत आहेत.(Pimpri News)