Bhimjayanti 2023 | पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिलला १३२ वी जयंती आहे. या ”भीमजयंती”च्या दिवशी आकाशातील ताऱ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले जाणार आहे. आणि एका ताऱ्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. ही रजिस्ट्री छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी केली आहे.
अमेरिकेत अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी ‘इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री’ नावाची संस्था…
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी ‘इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री’ नावाची एक संस्था आहे. या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावं देण्यात येतात. यासाठी भारतीय चलनाच्या हिशोबाने सांगायचे झाले तर ९ हजार रुपये शुल्क भरावे लागत आहे. यंदाची बाबासाहेबांची जयंती आगळीवेगळी व्हावी म्हणून राजू शिंदे यांनी या संस्थेकडे बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद करण्यासाठी ९ फेब्रुवारी अर्ज केला होता. आता त्यांना त्याचं प्रमाणपत्र आलं आहे. तर १४ एप्रिलला या ताऱ्याचं लाँचिंग होणार आहे.
दरम्यान, स्पेस रजिस्ट्रीच्या https:// space-registry.org या संकेतस्थळावरून हा तारा पाहता येऊ शकतो. तसेच मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर हा तारा पाहता येणार आहे.
याबाबत बोलताना राजू शिंदे म्हणाले की, ‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेंगा’अशा घोषणा अनेक कार्यक्रमांमध्ये दिल्या जातात. ही घोषणा लक्षात घेत राजू शिंदे यांनी बाबासाहेबांच्या नावाने अवकाशातील ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे. ताऱ्याच्या रजिस्ट्रीसाठी नाव दिले जाणाऱ्या व्यक्तीचं खूप व्यापक काम असायला पाहिजे, त्यासाठी संबंधित संस्थेकडून विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यामुळे तब्बल दीड महिन्यापासून प्रक्रिया करत आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर अखेर आकाशातील तार्याला बाबासाहेबांचे नाव मिळाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Railway News : पुणे-अमरावती विशेष रेल्वेगाडी १७ एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार…!