पिंपरी : जे एक काळ शिवछत्रपतींनी स्वत:च्या पराक्रमाने बाहुबलावरती, त्यागावरती, पराक्रमावरती देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, संत स्वाभिमान समर्पणाच्या अत्यंत दैदिप्यमान भावनेतून उत्पन्न केले हेते. ते चित्र उत्पन्न करण्याची इच्छा आमदार महेश लांडगे यांना हेते. याचाच अर्थ की, भविष्यात हिंदूस्थानचा काळ हा उज्ज्वल आहे. अशा व्यक्तींच्या हातात हा देश जगातल्या सगळ्या नीच राष्ट्रांवरती मात करुन अजिंक्य हिंदूस्थान उभा करेल, असा विश्वास शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केला.
महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना संधी या हेतुने आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या ‘‘इंद्रायणी थडी-२०२३’’ महोत्सवाला शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी शनिवारी भेट दिली.
अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृतीची पाहणी करुन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी आमदार लांडगे यांच्या हस्ते भिडे यांचा प्रभू श्रीराम मूर्ती देवून सन्मान करण्यात आला. तसेच, ‘महाराष्ट्र केसरी’ पै. शिवराज राक्षे यांचा गुरूजींच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रेरणामंत्राचे पठन झाले. यावेळी हभप दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, देव, देश अन् धर्मासाठी आयुष्यभर प्रबोधन करणारे शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजींनी इंद्रायणी थडीला भेट दिली. त्यामुळे आम्हा आयोजकांना अखंड कार्य करण्याची उर्जा मिळाली आहे. शिव-शंभू विचारांची नवी पिढी घडवण्याच्या त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा आमचाही संकल्प निश्चित आहे.महोत्सवस्थळी मोठा बंदोबस्त…
इंद्रायणी थडी महोत्सवात भिडे यांना प्रतिबंध करण्याचा करण्याचा इशारा काही संघटनांनी दिला होता. त्यापार्श्वभूमीवर महोत्सवस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तब्बल ५०० पोलीस कर्मचारी आणि संबंधित अधिकारी सुरक्षेची व्यवस्था करीत होते
. यासह १०० धारकरी भिडे यांच्या सोबत होते. यावेळी भिडे यांनी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती पाहिली, तसेच शूरवीर मराठे, ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन, ग्राम संस्कृतीला भेट दिली.