पिंपरी चिंचवड: तुळजापूर देवीच्या दर्शनाला गेलेल्या खाजगी बसला तुळजापूरच्या घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर 45 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथून खाजगी बसमध्ये भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या बसचा तुळजापूरच्या घाटात भीषण अपघात झाला आहे. ही घटना बुधवारी (२९ जानेवारी) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तुळजापूर शहराजवळच्या घाटात घडली आहे.
दरम्यान, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी तातडीने धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असून, अपघातस्थळी जखमींना मदतकार्य सुरू केल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले आहे.
अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथून खाजगी बसमध्ये भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. हि खाजगी बस बुधवारी (२९ जानेवारी) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तुळजापूर शहरा जवळच्य घाटात पलटी झाली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
इतर ४५ भाविक जखमी झाले आहेत. यातील १८ भाविक जण गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना धाराशिवच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमधील सर्व भाविक पिंपरी-चिंचवडच्या मोशी आणि डूडुळगाव येथील रहिवासी आहेत. ते तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गेले असताना हा अपघात झाला आहे.