पिंपरी: केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने बाजी मारत अव्वल स्थान पटकावले आहे. राष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवडला हा पुरस्कार प्राप्त झाला असून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते ११ जानेवारीला दिल्लीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात येऊन नागरिकांचा फिडबॅक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. यामध्ये दिलेली लिंक ओपन करून त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. या गुणतालिकेत कचरामुक्त शहरामध्ये पिंपरी-चिंचवड शहराला पाच स्टार तर हागणदारीमुक्तमध्ये सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.