Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिबिरांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास होतो; उद्योजक आनंद ढमाले यांचे प्रतिपादन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 December 2023, 14:21

पिंपरी : शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन उद्योजक आनंद ढमाले यांनी माले (ता. मुळशी) येथील नाग्या कातकरी वसतिगृहात नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय निवासी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.

खिंवसरा-पाटील विद्यामंदिर, वनवासी कल्याण आश्रम आणि लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्स यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या निवासी शिबिरात इयत्ता चौथी आणि पाचवीतील सुमारे १०१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वसतिगृह अधीक्षक जितेंद्र शर्मा, मुख्याध्यापक नटराज जगताप, लायन्स क्लबच्या अध्यक्ष रजनी देशपांडे, जया शिंगवी, मीरा गलांडे, विदुला पेंडसे, अनिता वझे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरामध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, शाळा समिती अध्यक्ष नितीन बारणे, लोकमान्य टिळक विभागाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बाल विभागप्रमुख आशा हुले, सैन्यदलातील निवृत्त अधिकारी रमेश आठवले, लेखा परीक्षक प्रसाद देव, विश्वास बागूल, व्याख्यात्या अपर्णा कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, वैज्ञानिक अंकिता नगरकर, स्मिता जोशी यांनी वेगवेगळ्या सत्रांमध्ये मार्गदर्शन केले.

 

शिबिरात मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली स्वावलंबन, लेखनकौशल्य, नाट्याभिनय प्रशिक्षण, हसतखेळत गणित, विज्ञानातील गमतीजमती, चित्रकला, सूर्यनमस्कार आणि योगाभ्यास, श्रीराम मंदिराची माहिती, मैदानी खेळ, शेकोटीभोवती विविध गुणदर्शन कार्यक्रम झाले. ज्ञान, माहिती आणि कलाकौशल्यांच्या या कार्यक्रमात पहिल्यांदाच आई-वडिलांना सोडून विद्यार्थी दोन दिवस सहभागी झाले होते.

या वेळी घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये विजेते ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे : गीता निर्वळ (नाट्याभिनय), सहारा सरवदे, आलिया शेख, रूपाली तायड (सुलेखन), गायत्री गोयेकर, आनम कोतवाल, तानाजी बाराटे, दिव्या मागीलवाड (चित्रकला), अनुराज उकरंडे, आयुष नाटे, समिधा भवार (धावणे); तर कशिश अब्बासी आणि सुमीत वाघमारे यांना शिबिरातील आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.

कृतिका काळे, साक्षी कुरळे, श्रद्धा होनशेट्टे, प्रमोदिनी बकरे या शिक्षिकांनी आणि पालक दीपाली सरवदे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. निसर्गाच्या कुशीत दोन दिवस रममाण झालेल्या विद्यार्थ्यांचे सृजन बहरून आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

मलठणच्या उपसरपंचपदी रामचंद्र गायकवाड बिनविरोध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.