Pune News : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले तसेच चोरी झालेल्या मोबाईलचा पोलिसांनी तपास करून नागरिकांचे हरवलेले एकूण १९ मोबाईल नागरीकांना परत केले आहेत. (Pune News)
पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेले मोबाईल चा शोध घेण्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सर्व पोलीस ठाण्याना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे ओतूर पोलीसांनी मोबाईल शोधकामी पथक नेमून गहाळ मोबाईलची तांत्रिकदृष्ट्या माहीती प्राप्त करून शोध घेतला असता वन प्लस, विवो, रेड मी, ओप्पो, सॉमसग, अशा विविध कंपनी मॉडेलचे एकुण १९ मोबाईल हस्तगत करणेत आले होते. (Pune News)
सदर मोबाईल बुधवारी पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या हस्ते नागरीकांना वाटप करण्यात आले. (Pune News)
सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस हवालदार महेश पटारे, नरेंद्र गोराणे, बी. बी. तळपे, पोलीस नाईक डी.आर.पालवे, पुणे ग्रामीण सायबर ठाण्याचे पोलीस हवालदार महेश गायकवाड, पोलीस नाईक सुनिल कोळी, चेतन पाटील व पोलीस मित्र छोटू मणियार यांनी केली. यावेळी उपस्थित सर्वाचे पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांनी आभार मानले. (Pune News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा