पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या ३० वर्षीय तरुणाचा उंदीर चावल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज मंगळवारी (ता. २) सकाळी घडली आहे. दरम्यान, या तरुणाचा अपघातात झाल्याने त्याच्यावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.
मात्र, उपचारादरम्यान तरुणाला उंदीर चावल्याने त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सागर रेणूसे (वय- ३०, ता. भोर) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. या ससून रुग्णालयातील प्रकारामुळे नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सागर रेणूसे याचा भोर तालुक्यात अपघात झाल्यानंतर त्याला 16 मार्चला ससुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचे ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र 26 मार्चला त्याची प्रकृती अचानक खालविली. सागर प्रकृती अचानक का खालवली.
याचा शोध घेतला असता. त्याला उंदीर चावल्याचं कारण समोर आले. हा प्रकार समजल्यानंतर नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. सागरच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला. त्यानंतर त्याची प्रकृती खालावत जाऊन निधन झाले आहे.
दरम्यान, सागर चे निधन झाल्यावर त्याचे उंदीर चावल्याचा निधन झाले आहे. असा आरोप सागराच्या नातेवाईकांनी केला आहे. तर या प्रकाराला ससून मधील डॉक्टरांनी नकार दिला आहे. मात्र डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरवर उंदीर चावल्याचे मान्य केले आहे.