राहुलकुमार अवचट
Patas News : पाटस : पाटस टोलनाका परिघातील 20 किमी परिसरातील नागरिकांना टोलमुक्ती करावी, तसेच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या विचार विविध समस्यांबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका पदाधिकारी यांच्यावतीने पुणे-सोलापूर एक्स्प्रेसवेज प्रायव्हेट लिमिटेड पदाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ६५ वर अनेक ठिकाणी बस थांबे कमतरता, अस्वच्छ शौचालये, वाहनचालक विश्रांती थांबे, अपूर्ण व खराब सर्विसरोड, स्ट्रीट लाईट महत्वाच्या ठिकाणी उपलब्ध नाही, टोल उभारणी अत्यंत चुकीच्या ठिकाणी करण्यात आली असून, (Patas News) त्यामुळे पाटसच्या परिसरातील अनेक गावाचे नागरिक बारामती या ठिकाणी सेशन कोर्ट, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, एमआयडीसी, साखरकारखाने, महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, आर.टी.ओ, महावितरण परिमंडळ कार्यालयाकडे जाताना काही फुट अंतरसाठी ९० रुपये व परत येताना ४५ रुपये असा एकूण १३५ रुपये बळजबरीने टोल घेतला जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड सोसावा लागत आहे जातो.
कोणत्या नियोजनातून चुकीच्या ठिकाणी टोल नाक्यास परवानगी देण्यात आली? त्याची समंती स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन करण्यात आली होती का ? एनएचएआय टोल फ्री क्रमांक ०१२०६२००९०० हा क्रमांक कायम बंद असून, तक्रारपुस्तिका ही टोल नाक्यावर न ठेवता पार्किंगमध्ये सुरक्षारक्षकाकडे ठेवून ग्राहकांना दिली जात नाही. धनदांडगे यांची वाहने मोफत सोडली जातात (Patas News) व सर्वसामान्य स्थानिक नागरिकांची टोलसाठी अडवणूक केली जाते. त्यामळे २० किमी परिघातील नागरिकांना सरसकट टोल माफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, असे न झाल्यास टोल प्रशासन नागरिकांचे मुलभूत अधिकार डावलत असल्याने आपणाविरोधात मोठे जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.(Patas News) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आपले प्रस्ताव, मंजूर रस्ते करार, नकाशे, अपूर्ण कामे यांची माहिती सविस्तर कागदपत्रे पुरावा देण्यात यावा, नागरिकांना माहितीसाठी नागरिकांची सनद दर्शनी भागात उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी दौंड तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्यावतीने करण्यात आली.
यावेळी टोल प्रशासन अधिकाऱ्यांशी विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली असून, दौंड तालुका अध्यक्ष नामदेव होले, शहराध्यक्ष गणेश जगताप, ऋषिकेश बंदिष्टी, अपर्णा पंडित, भाऊसाहेब दुरकेर, अर्जुन थोरात, संगीता गायकवाड, किसन भागवत, कैलास पंडित, कैलास थोरात, बाळासाहेब थोरात, अभिजीत भागवत, पोपट चोरमले, अमोल भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Patas News: पाटस- दौंड रस्त्यावर कारने दुचाकीला उडवले ! बिरोबावाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू !
Breaking News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आजपासून दौंड-सोलापूर नवीन डेमो सुरु…!