Passport पुणे : पासपोर्ट काढण्यासाठी नेमके काय करावे लागते, याची माहिती मिळविण्यासाठी झडावे लागत होते. त्यात ती प्रक्रिया खूपच किचकट वाटत असे. परंतु, आता ऑनलाइन झाल्याने पासपोर्ट काढणे अगदी सोपे झाले आहे. तसेच घरपोच लवकर मिळत असून, पासपोर्ट देण्याची संख्याही वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन पासपोर्ट काढण्यासाठी दिवासाला अपॉईंटमेन्ट दिल्या जातात. अपॉईंटमेन्टची संख्या वाढवली तर नागरिकांना ते आणखी सुलभ होईल, अशी मागणी नागरिकांची होती. त्यानुसार आता आधीपेक्षा आता दिल्या जाणाऱ्या अपॉईंटमेन्ट मध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांचा वेळ आणि त्रासही वाचणार आहे.
पासपोर्ट विभागाकडून दररोज सामान्य १०२५ आणि तत्काळसाठी २५० प्रतिदिन वाढविण्यात आल्या आहेत. एकूण २४०५ अपॉइंटनमेंन्ट दिल्या जात आहेत. त्यामुळे पासपोर्ट जारी करण्याचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती पुणे विभागाचे क्षेत्रिय पासपोर्ट अधिकारी अर्जुन देवरे यांनी दिली.
फिरायला जाणे, नातेवाईकांना भेटायला जाणे, परदेशात कामानिमित्त जाणे तसेच सध्या पुणेकरांचे परदेशात जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या कारणांमुळे पासपोर्ट काढला जात आहे. पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी सकाळी लवकर केंद्रावर जाऊन रांगेत थांबावे लागत होते. केंद्राबाहेर एजंटांची गर्दी दिसायची. पण आता मात्र या सर्व गोष्ट बंद झाल्या असून, ऑनलाइन नोंदणी केली की, लगेच अपॉइंटमेंट मिळते आणि पंधरा दिवसांच्या आत घरपोच पासपोर्ट पाठविला जातो.
गेल्या वर्षी २०२२ मध्ये आम्ही २०२१ च्या तुलनेत १ लाख १३ हजारांपेक्षा अधिक म्हणजे सुमारे ५० टक्के अधिक पासपोर्ट जारी केले. गती कायम ठेवत, या वर्षी 2023 च्या पहिल्या तीन महिन्यांत, आम्ही २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीच्या तुलनेत सुमारे 40 हजार अधिक पासपोर्ट जारी केले. पासपोर्ट आणि पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट्स (पीसीसी) साठी अपॉईंटमेंन्टची संख्या वाढवली आहे. यंदा पासपोर्ट सेवा केंद्र (PSK), पुणे येथे दररोज सामान्य आणि तत्काळ योजनेच्या अपॉईंटमेंन्ट अनुक्रमे 1025 आणि 250 प्रतिदिन वाढविल्या.
नोंदणी करण्यासाठी या लिंकवरचा वापरा..!
नागरिकांनी अगोदर https://www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पासपोर्टसाठी नोंदणी कराव. तसेच ज्यांना तत्काळ पासपोर्ट काढायचा असेल त्यांनी https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/online/tatkaalPassports या लिंकवर जावे.