हडपसर : रयत शिक्षण संस्थेच्या गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या. यामध्ये काही विद्यार्थिनी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव, वारकरी यांची वेशभूषा साकारली होती.
तसेच विठू नामाचा गजर करत चिमुकले वारकरी विद्यालयाच्या प्रांगणात पालखी घेऊन फिरले. काही विद्यार्थिनींनी पंढरीच्या विठ्ठलाचे वर्णन भजनातून केले. तर काही विद्यार्थिनींनी नृत्याविष्कार सादर केला. काही विद्यार्थिनींनी अभंग व ओव्यांचे गायन केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका झीनत सय्यद यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यालयातील विभागप्रमुख वैशाली महाले, सुवर्णा कानडे व सुनिल राख यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.