लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : पाचगणी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने गेली ८७ वर्षे पाचगणीसह परिसरातील नागरिकांना आर्थिक आधार देऊन उन्नती करण्याची संधी दिली आहे. सामान्य माणसांचे आयुष्य सुसह्य करुन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने पाचगणी क्रेडिट सोसायटीचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष आशिष दवे यांनी केले.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील घाटजाई विद्यामंदिर शाळा क्र. २ मध्ये दि पाचगणी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून दवे बोलत होते. (Pachgani News) या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष किसन उंबरकर, संचालक चंद्रकांत बिरामणे, विजयकुमार भिलारे, दिलीप बावळेकर, अमोल माने, रवींद्र कळंबे, रवींद्र गोळे, जाहिद सय्यद, प्रशांत कात्रट, चित्रलेखा कारंजकर यांच्यासह अनिल बोधे, जी. के. आंब्राळे आदी सभासद उपस्थित होते.
सभासदांना ७ टक्के लाभांश
या वेळी बोलताना दवे पुढे म्हणाले की, पाचगणी क्रेडिट सोसायटीच्या सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी व आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध असून, यावर्षी सभासदांना ७ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. (Pachgani News) संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना अध्यक्ष आशिष देवे यांनी संस्थेने ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या प्रगतीचे विवेचन केले. संस्थेने सभासदांसाठी सुरु केलेल्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
संस्थेचे सचिव संजय कांबळे यांनी नोटीस व हिशोब पत्रकांचे वाचन केले. विजयकुमार भिलारे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार दिलीप बावळेकर यांनी मानले. (Pachgani News) संस्थेची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी सर्व संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने शाळांना डिजिटल रूमच्या साहित्याचे वाटप
Pachgani News : मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज – मुख्याधिकारी निखिल जाधव