Pachgani News : पाचगणी, ता. १२ : ग्रामस्थांनी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावले पाहिजे आणि वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्हावे. असे आवाहन गोडवली (ता.महाबळेश्वर) गावचे उपसरपंच विष्णू (अप्पा) मालुसरे यांनी केले. (Pachgani News)
किमान एक तरी झाड लावले पाहिजे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांपूर्तीनिमित्त गोडवली येथील अष्टविनायक महिला समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी मालुसरे बोलत होते. (Pachgani News)
यावेळी माजी सरपंच संतोष चोरगे, ग्रामपंचायत सदस्या शोभा मोहन मालुसरे, अष्टविनायक समूहाच्या अध्यक्षा मनीषा संतोष चोरगे, अंगणवाडी सेविका कोमल सचिन चोरगे, माधुरी मालुसरे, स्वाती मालुसरे, गाजराबई मालुसरे, सुमन चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
विष्णू मालुसरे पुढे म्हणाले, निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. (Pachgani News)