Pachagani News : पाचगणी : काळाच्या बदलाबरोबर शासकीय कार्यालयेही अद्यावत होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांना शासनाच्या सुविधा त्वरित मिळाल्या पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लागतील. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. (Pachagani News)
‘ई चावडी’ प्रणाली प्रकल्प;
पांचगणी (ता. महाबळेश्वर ) येथील मंडल अधिकारी कार्यालयाच्या इमारत अध्यावतीकरणाचे उद्घाटन विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी राव बोलत होते. यावेळी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दूडी, अप्पर जिल्हाधिकारी गलांडे, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, पांचगणीचे मंडल अधिकारी चंद्रकांत पारवे, तापोळ्याचे मंडलाधिकारी रुपेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. (Pachagani News)
पुढे बोलताना सौरभ राव म्हणाले कि, महसूल विभागासंबंधीच्या कामकाजात एकसूत्रपणा येऊन सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वसामान्यांसाठी ‘ई चावडी’ प्रणाली प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून नागरिकांना त्वरित सेवा दिल्या पाहिजेत. (Pachagani News)
यावेळी मंडल अधिकारी चंद्रकांत पारवे म्हणाले, लोकसहभागातून या कार्यालयाची सुधारणा केली असून सुसज्ज अशा कार्यालयातून कुठलाही शेतकरी नाराज होवून जावू नये. याची दक्षता आम्ही घेणार आहोत. असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा राजेंद्र राजपुरे, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांचा प्रकाश गोळे व अप्पर जिल्हाधिकारी गलांडे यांचा दीपक कांबळे यांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. (Pachagani News)
यावेळी उद्योजक संतोष शेडगे , सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोळे, दांडेघरचे उपसरपंच जनार्दन कळंबे, माजी सरपंच शंकरराव कळंबे, तायघाटचे सरपंच सुहास भिलारे, दीपक कांबळे, महेश माने, संजय पवार तलाठी दीपक पाटील, भोसे तलाठी जयमाला मोहिते, विशाल गोळे, राजू दुधाने, विशाल पवार,जाॅन जोसेफ, अतिश भोसले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.