Otur Crime : पुणे (ओतूर) : पोलीस असल्याची बतावणी करून तब्बल पाच तोळे लांबवल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील ओतूर येथून समोर आला आहे. आम्ही पोलीस आहोत, एव्हढे सोने अंगावर घालून कशाला फिरता? सर्व सोने काढून खिशात ठेवा, अशी बतावणी करत दोघा भामट्यांनी वृद्धाकडून ३ सोन्याच्या अंगठ्या व १ सोनसाखळी असे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने रुमालात ठेवण्याचे नाटक केले व नंतर हात चलाखीने सोने घेत पसार झाले.
जुन्या बसस्थानकासमोर घडला प्रकार
ओतूर येथील जुन्या बसस्थानक परिसरातील राधाकृष्ण किराणा दुकानासमोर सोमवारी (ता. २२) सकाळी हा प्रकार घडला आहे. (Pretending to be the police in Otur, as many as five tolas of gold were cleverly stolen)
याप्रकरणी बबन विठ्ठल नलावडे (वय ६०, रा. धोलवड भवानीनगर, ता. जुन्नर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Otur Crime) त्यावरून या भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर येथील जुन्या बसस्थानक परिसरातील राधाकृष्ण किराणा दुकानासमोर नलावडे यांच्याकडे दोन भामटे आले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत आम्ही पोलीस आहोत, एव्हढे सोने अंगावर घालून कशाला फिरता? सर्व सोने काढून खिशात ठेवा, अशी बतावणी केली व वृद्धाकडून ३ सोन्याच्या अंगठ्या व १ सोनसाखळी असे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने रुमालात ठेवण्याचे नाटक केले. (Otur Crime) त्यानंर हात चलाखी करत सोने घेतले व पसार झाले. दरम्यान नलावडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kondhva Crime : कोंढव्यात पत्नीची चेकवर बनावट सही करून पावणेसहा लाखांचा अपहार; गुन्हा दाखल
Nashik Crime : नाशिक येथील जिल्हा हिवताप अधिकारी महिलेस लाच घेताना रंगेहाथ पकडले
Lonavala Crime : लोणावळ्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग