– विजय लोखंडे
वाघोली : महाराष्ट्र शासनाने राबवविलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व आधारकार्ड शिबिराचा कोलवडी-साष्टे गावातील महिला भगिनींनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश मदने यांनी केले आहे.
कोलवडी-साष्टे परिसरातील महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश मदने यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मोफत आधारकार्ड शिबीराचेही आयोजन मदने यांच्या वतीने करण्यात आले. यात नवीन आधारकार्ड काढणे, नाव, पत्ता, जन्मतारीख दुरूस्त करणे, मोबाईल नंबर लिंक करणे या सेवा दिल्या जात आहेत. तसेच माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरणे, शिबिर सुरु असून शिबिराला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या शिबिरात आत्तापर्यंत एकूण माझी लाडकी बहिण योजनेचे 74 अर्ज दाखल केले आहे. कोलवडी-साष्टे परिसरातील सर्व महिला भगिनींचे अर्ज दाखल करेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार असल्याचे उपसरपंच रमेश मदने यांनी सांगितले.