बापू मुळीक / सासवड : पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फक्त घोषणा केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाही, परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय विमानतळ होणार नाही, असं सांगतात. याची उलटी दिशा महायुती सरकारकडून सुरु आहे, असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. सासवड (ता. पुरंदर) येथील पालखी मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांच्या विजयी सभेच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, गुंजवणीचे पाणी आणणार ही फक्त अफवा आहे, खोटे बोलतात पण रेटून बोलतात. एक सही राहिली होती मग कोणी अडवली? पंधरा वर्षे झाले फक्त गुंजवणीचे पाणी आणतो, परंतु ते आणता आले नाही. आंतरराष्ट्रीय बाजार, पुरंदर उपसा, जानाई शिरसाई पाणी योजना, आयटी पार्क, जेजुरी, सासवड या ठिकाणी निधी आणलेला फक्त घोषणा, कृती काही नाही. पुरंदर-हवेली जनतेला फक्त गाजर दाखवण्याचे काम यांच्याकडून चालू आहे. बंडखोर व गद्दाराला साथ देऊ नका. तर अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवारचा विचार करावा. पक्ष सोडून जाणाऱ्यांना पाडा असं आव्हान शरद पवार यांनी यावेळी केले.
महिला वरील लैंगिक छळ, दुष्ट वागणूक, शेतकऱ्यांच्या पिकाला कोणताही हमीभाव हे महायुतीचे सरकार देऊ शकले नाही. अपयशी ठरले आहे. यांना गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तर नुसतं पाडु नका जोरात पाडा. कुणाचा पण नाद करा पण शरद पवार याचा नाद करायचा नाही, आजून दोन दिवस बाकी आहेत. संभाजी झेंडे यांनी महाविकास आघाडीला साथ द्यावी, असेही शरद पवार म्हणाले.