जीवन शेंडकर
Onion Subsidy : बोरीऐंदी (पुणे) : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील कांदा ३१ मार्चला सर्व शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या मार्केट कमिटीमध्ये विक्री केलेला आहे. विक्री केलेल्या कांद्यासाठी महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांसाठी ३५० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे अनुदान देण्याची घोषणा केलेली होती. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी सातबारा, कांदा विक्रीपट्टी, बँक पासबुक, आधारकार्ड ठरलेल्या वेळी आधी सादर केलेले आहे. Onion Subsidy
सातबारा उताऱ्यावर ८० टक्के शेतकऱ्यांसाठी पिक पाणी अनुदान जाहीर झाल्यामुळे, पिक पाहणी उन्हाळी हंगामात लागलेली असून, सदर कांदा पिके रब्बी हंगामातील असून, गाव कामगार तलाठी यांनी रब्बी हंगामातील पीक पाण्याची नोंद केलेली नसल्यामुळे प्रत्यक्ष प्रस्ताव सादर करताना हंगाम बदललेला होता. Onion Subsidy
ई पीक पाहणी मुळे उन्हाळी कांदा हंगामासाठी पिक पाहणी पर्यायाने करावी लागली. त्यामुळे अनेक मार्केट कमिट्यांमध्ये उन्हाळी हंगामातील पीक पाहणी अर्ज नामंजूर करण्यात करण्यात आले आहेत. रब्बी पिक पाहणी केलेलेच प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तरी ८० टक्के शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सरसकट कांदा अनुदान मिळावे अशी मागणी दौंड खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती मुरलीधर भोसेकर, ताम्हणवाडीचे माजी सरपंच संदीप ताम्हाणे, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मनोहर ताम्हाणे, हनुमंत म्हस्के आदी परिसरातील शेतकऱ्यांनी दौंडचे आमदार अँड. राहुल सुभाष कुल यांच्याकडे केली आहे.