उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावरील नायगाव (ता. हवेली) येथील अल्ट्राटेक कंपनीत चक्कर येऊन पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. 06) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अनिल महादेव पन्हाळकर (वय- 52, रा.पांडवदंड, फुरसुंगी पुणे) असे चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक टी. व्ही. जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वराज हॉस्पिटलमधील डाँ.अक्षय गोते यांना सुनिल हाके (रा. माळीमळा लोणी काळभोर) यांनी माहिती दिली कि, नायगाव येथे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये अनिल पन्हाळकर चक्कर येवुन पडले आहेत. दरम्यान, त्यांतर त्यांना पुढील उपचारासाठी बेशुध्दावस्थेत विश्वराज हाँस्पीटल नेण्यात आले आहे. डाँक्टरांनी पन्हाळकर यांना तपासुन मयत घोषीत केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत