शिरुर : पुणे-नगर महामार्गाच्या शेजारी पार्क केलेल्या गाडीची काच फोडून गाडीतील एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना शिरूर (जि. पुणे) येथील श्री समर्थ लॉन्स मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी (ता.७) दुपारी १ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी स्वप्नील गजानन घरडे (रा. खराडी, चंदननगर बायपास) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील घरडे यांनी मंगळवारी (ता.७) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास समर्थ लॉन्स मंगल कार्यालयाच्या पार्कींगमध्ये कार पार्क केली होती.त्यांच्या कारच्या दरवाज्याची काच फोडून अज्ञात चोरट्याने गाडीतील दोन लॅपटॉप, १२ हजार रुपये रोख व कागदपत्रे असा सुमार ९९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
दरम्यान, याप्रकरणी स्वप्नील घरडे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास शिरुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार चव्हाण करीत आहेत.