पुणे : पुण्यामध्ये पुन्हा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. लोहगाव भागात मद्यधुंद असलेल्या रुग्णवाहिका चालकाने पादचाऱ्याला उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून रुग्णवाहिका चालकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.