राहुलकुमार अवचट
यवत: अंतरवली येथील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी उंडवडी ग्रामस्थांच्या वतीने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
गेल्या दोन दिवसापूर्वी भोसलेवाडी या ठिकाणी कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. या मोर्चासाठी गावातील महिलांचा लक्षणीय सहभाग होता. या उपोषणाचाच एक भाग म्हणून आज सर्व उंडवडी ग्रामस्थांच्या वतीने उंडवडी चौक या ठिकाणी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दिनेश गडदे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, येणाऱ्या काळामध्ये सरकारने जर मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर उपोषणाची तीव्रता वाढवण्यात येईल. तसेच जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पुढार्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ तसेच तरुण वर्ग शाळकरी मुले यांनी उपस्थित राहून या उपोषणाला पाठिंबा दिला.
यावेळी सचिन गुंड, दत्तात्रय लोहकरे, अमोल भोसले, भाऊसाहेब सोनवणे, ऋतुराज गुंड, समीर लोहकरे, अतुल भोसले, विजय बानगुडे, स्वप्निल वराळे, महेश वराळे या मान्यवरांनी संपूर्ण उपोषणाचे नियोजन केले होते.