लोणी काळभोर (पुणे) : भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. गुन्हे शाखा युनिट ५ च्या दरोडा व वाहनचोरी पथकाने आव्हाळवाडी (ता. हवेली ) येथून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वर्मा असे आरोपीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
विधान परिषदेचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 09) घडली आहे. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिसांना सतिश वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटात सापडला होता. गुन्हे शाखा युनिट ५ च्या दरोडा व वाहनचोरी पथकाने आव्हाळवाडी (ता. हवेली ) येथून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…