पुणे : किल्ले सिंहगडाच्या घाट रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संरक्षक लोखंडी जाळी लावण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाने दीड कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे. आणि पावसाळा संपल्यानंतर लगेच या कामाला सुरवात होणार आहे.
किल्ले सिंहगडाच्या घाट रस्त्याने किल्ले सिंहगडावर जाताना अचानक दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेकदा रस्ता बंद होऊन वाहतूक कोंडी होते. तसेच कोणी दुचाकीस्वार किंवा चार चाकी घाट रस्त्याने जात असेल तर त्यांच्यावरही ही दरड कोसळू शकते. त्यामुळे ही गोष्ट विचारात घेऊन वन विभागाने तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याला संपूर्ण घाट रस्त्याला लोखंडी संरक्षक जाळी लावावी, अशी विनंती केली आहे.
दरम्यान, किल्ले सिंहगडाच्या घाट रस्त्याच्या विकासासाठी वन विभागाने दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यात जमा केला आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर लगेच या कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना पर्यटकांना प्रवास सुखकर होणार आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ म्हणाले कि, “सिंहगड घाट रस्त्याने जाताना कोणालाही इजा होऊ नये म्हणून लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याची आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती केली आहे. त्यासाठी त्यांना निधीदेखील दिला आहे. काम सुरू करण्याविषयी बांधकाम विभाग कार्यवाही करणार आहे.