राजेंद्रकुमार शेळके
Ojhar News : ओझर : एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२३ मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्रीक्षेत्र ओझर येथील विघ्नहर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.बी.साबळे यांनी दिली. त्यामध्ये प्रथम पाच जण विशेष प्राविण्यासह प्रथम पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. (Vighnahar Vidyalaya of Srikshetra Ozar 100 percent result)
उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे – कु.कवडे श्रावणी राजेंद्र – ९५.२० %, कु.भागवत प्रांजल दत्ता ९०.२०%, कु. जाधव सोहनी मच्छिंद्र – ९०%, कु.मस्करी वैष्णवी भालचंद्र – ९०%, कु. बुळे आईशा गणेश – ८९ % ,कु. जगताप ईश्वरी विद्याधर – ८८.६०% वरील सर्व विशेष नैपुण्य प्राप्त झालेल्या (Ojhar News) विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शालेय शिक्षण कमिटी, सर्व ग्रामस्थ श्रीक्षेत्र ओझर, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व शिक्षकांच्या वतीने विद्यार्थी व पालक यांचे विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
विशेष प्राविण्यासह ३४ विद्यार्थी उत्तीर्ण
विद्यालयात सुमारे ७५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बसले होते यंदा त्यात विशेष प्राविण्यासह ३४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये ३४, तर ०७ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण , असे एकूण ७५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा याही वर्षी निकाल १०० % लागला आहे. (Ojhar News) त्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख,उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव प्रशासन ए.एम. जाधव आदी संस्था पदाधिकारी यांनी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे कौतुक करून अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ojhar News : तब्बल ४२ वर्षांनी पुन्हा एकदा झाली वर्गमित्रांची भेट