शुभम वाकचौरे
Ojhar News : जांबूत : ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत ओझर येथील शेतकरी संतोष मांडे यांनी घरासमोर अंगणात लावलेली बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (क्र. एम. एच. १४ डि.जी. ६६५१) चोरीला गेल्याची घटना मागील महिन्यात घडली. त्यानंतर ४ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्याच शेतातील बांधावरचे चंदनाचे झाड तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत मांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता.
मंचर येथून चोरलेली एक मोटारसायकलही हस्तगत
दाखल गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न आरोपी शिवाजी अभिमन्यू सुर्यवंशी (वय २६, रा. डोळासणे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेली बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (क्र. एम. एच. १४, डि.जी. ६६५१) हस्तगत करण्यात आली. (Ojhar News) या वेळी या आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, अटक आरोपी शिवाजी अभिमन्यु सुर्यवंशी याच्याकडे आणखी एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल (क्र. एम. एच. १४ डी ई ३९१५) आढळली. ती त्याने अवसरी (मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) येथून चोरली असून, त्याबाबत मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
याचप्रमाणे आरोपी शिवाजी अभिमन्यु सुर्यवंशी याने ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल व चंदनाच्या झाडांची चोरी असे दोन गुन्हे व मंचर पोलीस स्टेशन येथे मोटारसायकल चोरीचा १ गुन्हा असे एकूण ३ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. (Ojhar News) ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, विभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस हवालदार महेश पठारे, पोलीस हवालदार बाळशीराम भवारी, पोलीस हवालदार मनोजकुमार राठोड, पोलीस हवालदार आनंदा भवारी, पोलीस नाईक नदीम तडवी, पोलीस नाईक संदीप लांडे, पोलीस हवालदार डी. आर. पालवे, होमगार्ड चंद्रकांत जाधव, सुमित ससाणे, राहुल फलके यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ojhar News : श्रीमती एस.आर.केदारी बालक मंदिरमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
Ojhar News : श्रीक्षेत्र ओझरच्या विघ्नहर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
Ojhar News : तब्बल ४२ वर्षांनी पुन्हा एकदा झाली वर्गमित्रांची भेट