लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोरच्या मंडल अधिकारीपदी नुरजहा सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली. उरुळी कांचन सर्कलसह लोणी काळभोर सर्कलचा अतिरिक्त पदभार स्वीकारण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून नियुक्ती आदेश पारित करण्यात आला आहे.
लोणी काळभोर या नवीन सर्कल सजामध्ये लोणी काळभोर, सिद्राम मळा, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबाची, तरडे या तलाठी सजाचा समावेश असून, लोणी काळभोरमध्ये नव्याने सिद्राम मळा येथे तलाठी सजा कार्यालय होणार आहे. तसेच संबंधित गावे व तलाठी सजा थेऊर सर्कलमधून वगळण्यात आली आहे.
अगोदरच थेऊर सर्कलच्या विविध कारनाम्यांमुळे व कारभारामुळे नागरिकांना आर्थिक वेठीस धरण्याचा प्रकार वाढल्याने येथील जनता कंटाळलेली होती. त्यातच थेऊर सर्कलमधून लोणी काळभोर या नवीन सर्कलची निर्मिती झाल्याने थेऊर मंडल अधिकारी कार्यालयात आता थेऊर, कुंजीरवाडी, कोलवडी, मांजरी बुद्रुक, महादेवनगर व मोरे वस्ती या तलाठी सजाचा समावेश राहिला आहे. दरम्यान, महसूली जाचातून लोणी काळभोरकरांची सुटका झाल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
शासनाच्या मान्यतेने हवेली तालुक्यात नव्याने मंडल अधिकारी सजाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे उरुळी देवाची, महंमदवाडी, फुरसुंगी, कात्रज, कोंढवा, आंबेगाव बुद्रुक, धायरी, डोणजे, खानापूर, शिवणे, कोंढवे धावडे, अष्टापूर, लोणी काळभोर, खराडी व लोणीकंद अशी नव्याने मंडल अधिकारी कार्यालयाची निर्मिती झाली आहे. यापूर्वी हवेली तालुक्यात हडपसर, थेऊर, उरुळी कांचन, वाघोली, कळस, खडकवासला, खेड शिवापूर व कोथरूड अशी आठ मंडल अधिकारी कार्यालये होती.
नागरिकांची महसूली कामे सुलभ होणार
याबाबत बोलताना माजी उपसभापती युगंधर उर्फ सनी काळभोर म्हणाले, “प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य असून, हवेली तालुक्यात नव्याने मंडल अधिकारी व तलाठी कार्यालये होणार असल्याने खातेदार शेतकरी बांधवाच्या फेरफारवरील तक्रारी केसेसेचे कामकाज विनाविलंब होईल, अशी अपेक्षा आहे. फेरफार नोंदी वेळेवर निर्गत होण्याची आशा आहे. हवेलीत नव्याने निर्मित झालेल्या सर्कल कार्यालयातून महसूलचा कारभार सुरू होणार असल्याने नागरिकांची महसूली कामे सुलभतेने व तत्पर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे”.
हवेलीत नव्याने नियुक्त झालेल्या मंडलाधिकाऱ्यांची (सर्कल) नावे व पदस्थापना :
– संदीप शिवशंकर शिंदे, हवेली, मंडळ अधिकारी खराडी, तहसील कार्यालय हवेली,
– मनीषा नारायण भोंगळे मंडळ अधिकारी उरुळी देवाची, तहसील कार्यालय हवेली.
– किशोर कमलाकर पाटील, मंडळ अधिकारी, आंबेगाव बु, तहसील कार्यालय हवेली
– संदीप सुरेश झिंगाडे, मंडळ अधिकारी, लोणीकंद, अपर तहसील कार्यालय लोणी काळभोर
– साधना सुनील चव्हाण, मंडळ अधिकारी कात्रज, तहसील कार्यालय, हवेली
– प्रकाश ज्ञानू महाडिक हवेली, मंडळ अधिकारी डोणजे, तहसील कार्यालय हवेली
– चांदपाषा पापमिया तांबोळी, हवेली, मंडळ अधिकारी दासवे, तहसील कार्यालय हवेली
– अर्चना निरंजन ठेंबरे, मंडळ अधिकारी धायरी, तहसील कार्यालय हवेली
– वर्षा अप्पासाहेब वाडेकर, मंडळ अधिकारी, शिवणे, तहसील कार्यालय हवेली
– गौतम हरिश्चंद्र ढेरे, मंडळ अधिकारी, खानापूर, तहसील कार्यालय हवेली
– नामदेव बबन सोनवणे, मंडळ अधिकारी, फुरसुंगी, तहसील कार्यालय हवेली
– गीताश्री अशोकराव काळे, मंडळ अधिकारी अष्टापूर, अपर तहसील कार्यालय लोणी काळभोर
– संदीप बिभिषण शिंदे, मंडळ अधिकारी, कोंढवा, तहसील कार्यालय हवेली
– भारत ज्योतिबा रूपनवर, मंडळ अधिकारी, कोंढवे धावडे, तहसील कार्यालय हवेली