पुणे : व्यावसायिकाला धमकावून त्यांची जमीनी बळकाविल्या आणि खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुख्यात गुंड बापू नायर याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने बापु नायर याच्यासह ७ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डि.व्ही. कश्यप यांनी मंगळवारी २८ मी रोजी आदेश दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जमीनीचा बेकायदेशीर ताबा मारणे, खंडणी आणि खूनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर गुन्हा केल्या प्रकरणी दिपक उर्फ डी कृष्णा कदम, अमोल उर्फ पम्या अयोध्या प्रसाद बसवंत, कुमार उर्फ बापू प्रभाकर नायर, निलेश श्रीनीवास बसवंत, अमीत राजाभाऊ जरांडे, वर्षा शंकर फडके, दत्तात्रय उर्फ दत्ता बाळू माने, नितेश श्रीनीवास बसवंत यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्यात आला होता.
या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. याप्रकरणी निलेश कुंतीलाल बोत्रा (वय-३९, रा.पर्वती) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुंड बापू नायर, निलेश बसवंत आणि इतर सात जणांची पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नायर टोळीने बोत्रा कुटुंबीयांना धमकावून जमीनीचा ताबा घेतला होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना हत्यारासह रंगेहाथ पकडले होते, त्यामुळे या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दोन पोलिसही होते. विशेष म्हणजे या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. मात्र, न्यायालयाने साक्षीदारांची साक्ष आणि इतर पुरावे ग्राह्य न धरता ८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.