Pune Yerawada Jail : पुणे शहरातील येरवडा कारागृहातून एक कुख्यात गुंड पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान कारागृहातून गुंड कधी पळून गेला हे येरवडा कारागृह प्रशासनाला देखील माहित नाही. २० नोव्हेंबरला दुपारी कारागृह अधिकाऱ्यांनी जेव्हा तुरुंगातील कैद्यांची मोजणी केली, तेव्हा हा प्रकार समोर आला आहे. आशिष जाधव, असं कारागृहातून फरार झालेल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. (Pune Yerawada Jail)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, येरवडा कारागृहात असलेला कुख्यात गुंड याने वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २००८ साली एका व्यक्तीची हत्या केली होती. या प्रकरणात आशिष जाधव या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता. आरोपी जाधवची तुरुंगातील वागणूक पाहता, येरवडा कारागृह प्रशासनाने त्याला रेशन विभागात कामासाठी नियुक्त करण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. (Yerawada Jail)
सोमवारी दुपारी अधिकाऱ्यांनी जेव्हा तुरुंगातील कैद्यांची मोजणी केली, तेव्हा हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, आरोपी जाधव अधिकाऱ्यांना कुठेही दिसून आला नसल्यामुळे शोधाशोध सुरु केली, यावेळी तुरुंगात असलेल्या इतर कैद्यांना आरोपीबाबत विचारणा केली असता, आम्हाला तो कुठे गेला याबाबतची काहीच माहिती नसल्याचं कैद्यांनी पोलिसांना सांगितलं.
कारागृहात कडक पहारा असताना देखील आरोपी पळाला कसा?
दरम्यान, पुण्यातील येरवडा कारागृहात पोलिसांचा कडक पहारा असताना देखील आरोपी पळाला कसा? असा प्रश्न कारागृहातील कर्मचाऱ्यांना तसाच पोलिसांना पडला आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीच्या शोधात पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली असून कसून तपास सुरु आहे.(Pune Police News)